Hasan Mushrif  esakal
महाराष्ट्र बातम्या

Nanded Hospital Deaths: औषधांचा तुटवडा नाही, एक-एक मृत्यूचा हिशोब देणार; नांदेडच्या घटनेवर मंत्री मुश्रीफांची स्पष्टोक्ती

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे थैमान सुरूच आहे.

रोहित कणसे

नांदेड येथील शासकिय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे. यादरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यानंतर डॉ शंकराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ थोड्याच वेळात नांदेडसाठी निघणार आहेत, मात्र या एकूणच घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. तसेच प्रत्येक मृत्यूचे कारण हे देखील स्पष्ट जाणून घेतलं जाणार आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई ही सरकारकडून केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. इतकेच नाही तर औषधांचा रुग्णालयात कुठलाही तुटवडा नसल्याची स्पष्टोक्ती देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

मी नांदेडला जातोय, कालच मी आयुक्त आणि संचालकांना पाठवलं आहे. आम्ह समिती स्थापन करतो आहोत. एक-एक मृत्यूची सखोल चौकशी करू आणि याला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई करू असे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रिफ म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते.

तसेच संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एका दिवसाता १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबद्दल मुश्रीफांना विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, घाटी रुग्णालयात रोज दोन हजार पेशन्ट येतात, तिथं पंधराशे ते सोळाशे पेशंट रोज ओपीडीला येतात. घाटीची माहिती देखील मी घेतो.

परंतु शेवटच्या स्टेजला अनेक पेशंन्ट येतात अशी माहिती आहे. अपघात झालेले रुग्ण येथे येतात. खासगी रुग्णालयात दाखल केलेला एखादा रुग्ण बील जास्त झालं की, त्याला सरकारी रुग्णालयात पाठवलं जातं. प्रसूतीवेळी कमी वजनाची मुलं जन्माला येतात अशा अनेक गोष्टी आहेत. यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा, औषधं नसतील तर आम्ही निश्चित कारवाई करू असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

एक-एक मृत्यूचा मी हिशोब देईल. मृत्यू कसा झाला, काय झालं आणि कोण कोण जबाबदार आहे याची माहिती घेण्यात येईल असेही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT