Hasan Mushrif ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News: 40 वर्षात असं पहिल्यांदाच घडलंय! पवारांची कोल्हापूर सभा अन् हसन मुश्रीफ झाले भावुक

संतोष कानडे

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. पवारांचे खंदे समर्थक हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जात सत्तापक्षाला समर्थन दिलं. त्यामुळे मुश्रीफ भावुक झालेले बघायला मिळाले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 40 वर्षानंतर प्रथमच कोल्हापुरात शरद पवार येऊन देखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. का निर्णय घ्यावा लागला याचे विवेचनही आम्ही केलेले आहे. आज पवार साहेब येत आहेत, मात्र मी त्यांच्यासोबत नाही.. असे सांगत ते भावुक झाले.

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी राज्यभर स्वाभिमानी यात्रा सुरु केली आहे. शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांचा मतदारसंघ येवला येथे घेतली. दुसरी सभा बीडमध्ये घेतली. बीडमधील सभेची खुपच चर्चा झाली. कारण धनंजय मुंडे यांना टक्कर देणारा उमेदवार पवारांनी पुढे आणलाय.

त्यानंतर आज पवारांची तिसरी सभा कोल्हापूरमध्ये होत आहे. कोल्हापूरमध्ये शरद पवार काय बोलतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कोल्हापूरच्या सभेमध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज मंचावर उपस्थित राहणार आहेत. शाहू महाराज आगामी लोकसभेचे पवार गटाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT