esakal

महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif and Samarjit Ghatge: “शत्रूचा शत्रू तो आपला मित्र”, हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांची एकत्र खुर्ची, कागलचे राजकारण बदलणार!

Hasan Mushrif, and Samarjit Ghatge come together : जाणून घ्या, कट्टर विरोधक राहिलेले घाटगे–मुश्रीफ नेमकं कोणत्या कारणामुळे आले एकत्र!

Mayur Ratnaparkhe

Hasan Mushrif and Samarjit Ghatge Unite for Kagal Nagarparishad : कागलमध्ये आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. एकमेकांची कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले हसन मुश्रीफ अन् समरजीत घाटगे यांचे अखेर मनोमिलन झाले आहे. एवढच नाहीतर या दोन्ही मातब्बर नेत्यांनी पहिल्यांदाच  संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन, आता कागल नगरपरिषदेसाठी एकत्र आहे पण आम्ही पुढील काळात एकत्र राहू, असं स्पष्ट केलं आहे. यामुळे आगामी काळात कागल तालुक्याचे राजकारण बदलणार आहे.

 समरजीत घाटगेंनी काय सांगितलं? -

समरजीत घाटगे म्हणाले, वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली त्यामुळे आम्ही तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. आतापर्यंत एकमेकांविरोध पत्रकारपरिषद घेतली. मात्र आता आता एकत्र घेत आहोत. कार्यकर्त्यांचे नुकसान होणार नाही. दोघांची ताकद एकत्र करून दोन नगर परिषदेमध्ये विकास करू. या पुढे टीका टिपणी केली जाणार नाही. ही युती सत्तेसाठी नाही कागलच्या भविष्यासाठी आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले? -     

तर हसन मुश्रीफ  म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीची युती झाली आहे. काल मी आणि समरजीत घाटगे यांनी काही भूमिका मांडली, पण अचानक युती झाली आम्ही कार्यकर्ते यांची दिलगिरी व्यक्त केली. कागल तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि आता आघाडी झाली. या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू. आम्ही जास्तीतजास्त कार्यकर्ते जपले. ज्यानी ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव

'यदा- कदाचित'वर झालेली बंदी घालण्याची मागणी पण आनंद दिघे नाटक पाहायला आले आणि... नेमकं काय घडलेलं?

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: परंडा येथे दोन गटात दगडफेक, आमने सामने आल्याने नगरपालिकेमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT