hasan mushrif esakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना अटक होणार की नाही? विशेष कोर्टातील सुनावणी पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर मुश्रीफांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली. आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

आज हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होती. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. अटक टाळण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी आणि सीए यांनी याचिका दाखल केली आहे. चालू आठवड्यात त्यांना अटकेपासून मिळालेला दिलासा संपणार आहे.

कोर्टातील आजची सनावणी संपलेली असून मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ५ एप्रिलला कोर्ट निर्णय देणार आहे. हाटकोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना अटकेपासून संरक्षण मिळणार का? हे येत्या ५ तारखेला स्पष्ट होणार आहे.

हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

नेमकं प्रकरण काय?

नलावडे साखर कारखाना प्रकरणी 11 मार्च रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. मागील दोन महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 'जबरा फॅन' बनली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली- अनेकदा प्रामाणिकपणाची मोठी किंमत चुकवावी लागते

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर पुन्हा मोठी दुर्घटना! मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND vs SL 1st Test: मालिका सुरू होण्यापूर्वीच गौतम गंभीरची फलंदाजाला धमकी? चांगला नाही खेळलास तर संघाबाहेर करेन... एकच खळबळ

Marathi News Live Updates : चाकणमध्ये ५ ते ७ किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा! खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघात; २ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे गंभीर

Career Numerology: IT, कोडिंग ते रिसर्च; अंकशास्त्रानुसार 'या' ४ मूलांकाच्या लोकांना मिळते परदेशात नोकरी!

SCROLL FOR NEXT