Ladki Bahin

 

sakal 

महाराष्ट्र बातम्या

लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालायं? ‘या’ कार्यालयात समजणार नेमके कारण; ‘ई-केवायसी’ दुरुस्तीस ३० एप्रिलपर्यंत मुदत; एप्रिलअखेर मिळणार एकत्रित ३००० रुपये

लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली. त्यात ६५ ते ७० लाख महिलांचा लाभ बंद झाला, पण त्या महिलांना आपला लाभ बंद का झाला? या प्रश्नाचे उत्तर समजलेले नाही. त्यांना आता थेट जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातच मिळणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरवातीला सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख २० हजार महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांना मिळाला. पण, त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली. त्यात ६५ ते ७० लाख महिलांचा लाभ बंद झाला, पण त्या महिलांना आपला लाभ बंद का झाला? या प्रश्नाचे उत्तर समजलेले नाही. त्यांना आता थेट जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातच मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ७१ महिलांकडे चारचाकी वाहने निघाली. योजनेच्या निकषांनुसार ६५ वर्षांवरील १५ हजार ५३० महिला आणि तीन हजार २८२ तरुणी अपात्र ठरल्या. जिल्ह्यातील ९८ हजार २१ महिलांची ‘ई-केवायसी’ चुकल्याची माहिती राज्यस्तरावरुन जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयाकडे आली होती. दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीनंतर लाभ बंद झाला. परंतु, लाभ बंद झाल्याचे कारण त्यांनाच समजलेले नाही.

अनेक लाडक्या बहिणी ‘तुम्हाला पैसे मिळाले का, मला दोन महिन्यांपासून लाभ मिळालेला नाही’ असे शेजारील महिलांना विचारत आहेत. त्यांना आता जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयातच माहिती मिळणार आहे. लाभ बंद होण्याचे नेमके कारण, अधिकारीच सांगतील. जिल्हाधिकाऱ्यांकडील लॉगिन जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे आहे.

थेट मंत्रालयातूनच चालते योजनेचे काम

१ जुलै २०२४ पासून योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील किती महिलांनी ‘ई-केवायसी’ केलीली नाही, किती महिलांच्या ‘ई-केवायसी’त चुका झाल्या, आतापर्यंत कोणकोणत्या निकषांनुसार किती महिला अपात्र ठरल्या, याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांकडे देखील नाही. उपायुक्त, सहायक आयुक्त, जिल्ह्यांचे अधिकारी तर या माहितीपासून खूपच दूर आहेत. अधिकाऱ्यांना आकडेवारी विचारल्यावर सगळेच म्हणतात, ‘आमच्याकडे कोणतीच आकडेवारी नाही, कामकाज थेट मंत्रालयातूनच चालते’. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही लाभार्थींचा योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार, किती लाभार्थींचा लाभ बंद झाला हे सांगता येत नसल्याचे अनुभव सर्वांनाच येत आहेत.

अपात्र ठरण्याचे कारण समजू शकते

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद का झाला, याची माहिती तथा कारण महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून मिळेल. कोणत्या निकषांत त्या महिला लाभासाठी अपात्र ठरल्या, याचे नेमके कारण तेथे समजू शकते.

- जामसिंग गिरासे, महिला विकास, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchang 10 April 2026 : शुक्रवार पंचांग! राहू काळ, शुभ वेळा आणि चंद्रबळ जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - १० एप्रिल २०२६

Easy to Make Breakfast Recipes : सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल्स

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १० एप्रिल २०२६

आरोग्यदायी कोहळा

SCROLL FOR NEXT