CCTV 
महाराष्ट्र बातम्या

स्वस्तातल्या सीसीटीव्हींची कमाल पाहिली का? तुम्हीही हसाल (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होत असते. सीसीटीव्ही हा अशाच व्हायरल होणाऱ्या विषयांपैकी एक. शहरात सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या चौकांपासून ते अगदी घराच्या गेटपर्यंत आणि मोठमोठाल्या मॉलपासून ते अगदी छोट्या पान टपरीपर्यंत सर्वत्र सीसीटीव्हींचे वास्तव्य असलेले आपल्याला पाहायला मिळते. गावाकडे मात्र चौकात किंवा पारावर बसलेल्या वृद्ध मंडळींनाच नेटकऱ्यांनी सीसीटीव्ही ही पदवी बहाल केलीय. (याबाबतचे मीम्स अधून-मधून सतत व्हायरल होत असतात.)   

सध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या अगदी साध्या दुकानाच्या बाहेरही आपल्याला सीसीटीव्ही लावलेले पाहायला मिळतात. खिशाला परवडतील अशा माफक दरात हे सीसीटीव्ही उपलब्ध होत असल्याने हल्ली सर्रास त्याचा वापर केला जात आहे. अशाच एका दुकानाच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्त्यावरून जाणारी माणसे दिसत आहेत. मात्र, हे फुटेज नेहमीप्रमाणे दिसत नाही. धडधाकट शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्ती व्यंग असल्यासारख्या दिसत आहेत. काहींना पोट सुटले आहे, तर कुणाच्या पाठीला बाक आला आहे. 

हा सगळा मजेशीर प्रकार स्वस्तातील सीसीटीव्हींमुळे होत आहे. हलक्या प्रतीच्या इलेक्ट्रीक वस्तू सीसीटीव्हीमध्ये वापरल्याने रेकॉर्ड होणारे फुटेज असे मजेशीर दिसतेय. तुम्ही देखील असा स्वस्तातील सीसीटीव्ही तुमच्या घराबाहेर, दुकानाबाहेर लावला असेल, तर त्यात रेकॉर्ड होणारे फुटेज व्यवस्थित दिसतेय का याची खात्री करा. जर अशा प्रकारचे फुटेज तुमच्याही सीसीटीव्हीमध्ये दिसत असेल, तर हे फक्त हसण्यावारी घेऊ नका. ज्या कारणासाठी हा सीसीटीव्ही बसविला जातो, ती आपली आणि आपल्या परिसराची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT