महाराष्ट्र

मराठा आरक्षण अखेर अस्तित्वात!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (मराठा समाज घटक) वर्गाकरिता शिक्षण संस्थांमध्ये 12 टक्के आणि सरकारी सेवांत म्हणजे सरकारी नोकऱ्यांत 13 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सुधारित विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाजास आरक्षण लागू झाले आहे. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हे सुधारित विधेयक मंजूर करण्यात आले होते. यामुळे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्था यातील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. 

मराठा समाजासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांत 16 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक 2018 मध्ये केले होते. मात्र, उच्च न्यायालयाने 16 टक्के आरक्षणाऐवजी शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांत 13 टक्के आरक्षण लागू करावे, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारला हे सुधारित विधेयक विधिमंडळात मंजूर करावे लागले. त्यानंतर मंजुरीसाठी पाठवले गेल्यानंतर राज्यपालांनी सही केली आहे. यानुसार राज्यात नोकरभरती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीची बिंदुनामावली पद्धत निश्‍चित करण्याचे सर्व विभागाला आदेश दिले. त्यानुसार यापुढे नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्था यामधील प्रवेशाची प्रक्रिया पार पाडली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT