Tanaji Sawant Sakal
महाराष्ट्र बातम्या

Tanaji Sawant: आरोग्य मंत्री तानाजी सावंत जेव्हा चिडून निघून गेले...; पाहा Video

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका सभेत बोलताना मराठा आरक्षणाविषयी आणि मराठा समाजाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना उत्तर देणे टाळलं आहे. मराठा समाजाला सत्तांतर झाल्यावरंच आरक्षणाची खाज सुटली का? असं वक्तव्य त्यांनी काल केलं होतं. पण त्यावर प्रश्न विचारले असता ते न बोलता चिडून निघून गेले आहेत. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Tanaji Sawant Latest Updates)

दरम्यान, मराठा समाजाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पण सकाळच्या प्रतिनिधीवर चिडून त्यांनी बूम हाताने मागे सारला आणि निघून गेल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर त्यांनी गाडीत बसल्यावर या वक्तव्यावरून समाजाची माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाला राग आला असेल तर मी लाख वेळा माफी मागेल असंही ते नंतर म्हणाले आहेत.

ज्या मराठा समाजाच्या जीवावर मी कॉलर ताठ करून हिंडतो, त्याची एक वेळा नाही तर एक लाख वेळा माफी मागायची माझी तयारी आहे. मात्र माझं वक्तव्य पूर्णपणे ऐकून घ्यावं. त्याचा विपर्यास करू नये, असं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री आणि मराठा समाजाचे नेते तानाजी सावंत यांनी दिलं आहे. उस्मानाबाद येथील त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनाही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर आता स्वतः तानाजी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले होते मंत्री तानाजी सावंत?

"फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर प्रचंड टीका केली, जातीयवाद केला गेला. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देणारच" असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT