Tanaji Sawant Canva
महाराष्ट्र बातम्या

आरोग्यमंत्र्यांच्या गावचेच आरोग्य केंद्र कागदावर!५ महिन्यानंतरही जागा मिळेना; मनुष्यबळाअभावी अनेक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रांची दुरवस्था

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या जन्मगावी वाकाव (ता.माढा) येथे १२ जुलै २०२३ रोजी उपकेंद्राचे आरोग्य केंद्रात रूपांतरणास आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली. केंद्र, केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय आहे. पण, अद्याप त्यासाठी ना निधी ना जागा मिळाली.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या जन्मगावी वाकाव (ता. माढा) येथे १२ जुलै २०२३ रोजी उपकेंद्राचे आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली. त्यासाठी केंद्र व केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय केली जाणार आहे. पण, अद्याप त्यासाठी ना निधी ना जागा मिळाली. तालुका आरोग्याधिकाऱ्यांना त्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर जिल्ह्यात अकराशेहून अधिक गावे आहेत, पण ७७ गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४३१ गावांमध्ये उपकेंद्रे आहेत. अजून सात केंद्रे व ३४ उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून जागा अपेक्षित आहे. जागा मिळाल्यानंतर त्याठिकाणच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती, राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५व्या वित्त आयोगातून निधी मिळतो. पण, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वाकाव गावातील आरोग्य केंद्राला मंजुरी मिळून पाच महिने झाले आहेत.

तत्पूर्वी, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी जावून जागेची पाहणी देखील केली होती. गावाजवळील तीन एकर गायरान जमीन आरोग्य केंद्रासाठी मिळेल असा विश्वास होता. मात्र, त्यानंतर त्यासंदर्भातील कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायतीकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य विभागाला त्याबाबत काहीही कळविण्यात आलेले नाही.‘सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ याची प्रचिती खुद्द आरोग्यमंत्र्यांच्याच गावात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या गावातील केंद्राची अशी स्थिती आहे, तर उर्वरित मंजूर केंद्रे व उपकेंद्रे कधीपर्यंत होतील, याबद्दल संबंधित गावांमधील नागरिकांना चिंता आहे.

मनुष्यबळाअभावी आरोग्य सुविधा विस्कळीत

वास्तविक पाहता आरोग्य केंद्रासाठी दोन डॉक्टर, एक औषधनिर्माण अधिकारी, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक आरोग्य सेविका, दोन आरोग्य सहाय्यक व एक सहायिका, तीन परिचर आणि एक लिपिक, आशा पर्यवेक्षक, कंत्राटी डाटा ऑपरेटर, बाह्य यंत्रणेचा एक रक्त संकलन कर्मचारी, असे कर्मचारी असतात. दुसरीकडे उपकेंद्रासाठी एक आरोग्य सेवक व सेविका, अर्धवेळ स्री परिचर आणि आशा स्वयंसेविका (एक हजार लोकसंख्येसाठी एक) एवढा स्टाफ असतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील अनेक केंद्रे व उपकेंद्रांचे ‘आरोग्य’ मनुष्यबळाअभावी बिघडल्याची वस्तुस्थिती आहे. त्यावर आता आरोग्यमंत्री भरतीसाठी प्रयत्न करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘डीपीसी’तून १२ कोटींचा निधी प्रस्तावित, पण...

सार्वजनिक आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांसाठी संबंधित ग्रामपंचायतीने शासकीय जागा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात आगामी वर्षात गुरसाळे व वाकाव येथे आरोग्य केंद्रे बांधली जाणार आहेत. त्यातील गुरसाळे केंद्रासाठी जागा मिळाली आहे. पण, खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या गावातील आरोग्य केंद्रासाठी जागा मिळालेली नाही. तरीदेखील पुढच्या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात दोन्ही आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी १२ कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Updates : संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

Solapur News: 'विठुरायाच्या मंदिराला एक कोटीचा चांदीचा दरवाजा'; गुरुपौर्णिमेला दोन शिष्यांची गुरूला अनोखी दक्षिणा

SCROLL FOR NEXT