Eknath Shinde - Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर 'या' दिवसापासून मॅरेथॉन सुनावणी; निकाल कधी अन् काय लागणार?

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ते येत्या १४ सप्टेंबरपासून प्रत्येक आमदाराची सलग सुनावणी घेणार आहेत. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. त्याचा निकाल कधी आणि काय? लागणार याबाबत उत्सुकता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता प्रत्यक्ष सुनावणीला विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात गुरुवारपासून (ता.१४) सुरुवात होणार आहे. यानिमित्ताने दाखल झालेल्या विविध याचिकांवर विधानसभेचे अध्यक्ष यादिवशी सुनावणी घेणार आहेत. यानिमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार एकत्र येणार आहेत. वाद आणि प्रतिवाद करणाऱ्या आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले असल्याचे स्पष्ट करीत राहुल नार्वेकर यांना त्यावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांची लिखित भूमिका मांडण्यासाठी नोटीस पाठवली होती.

तसेच यासाठी पुराव्यांची देखील मागणी केली होती. विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीवर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांकडून उत्तर सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. नार्वेकर यांनी ही मागणी मान्य करत वेळ वाढवून दिला. शिंदे गटाच्या आमदारांनी देखील विधानसभा अध्यक्षांकडे हजारो पानांचे उत्तर लिखित स्वरूपात सादर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT