Temperature Sakal
महाराष्ट्र बातम्या

विदर्भ उन्हाच्या झळांमुळे होरपळला

राज्यात बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर पोचला असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचे चटके असह्य झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

राज्यात बऱ्याच ठिकाणी पारा ४३ अंशांच्या वर पोचला असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचे चटके असह्य झाले आहेत.

पुणे - राज्यात बऱ्याच ठिकाणी पारा (Temperature) ४३ अंशांच्या वर पोचला असून उत्तर महाराष्ट्र, (North Maharashtra) विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) उन्हाचे (Heat) चटके असह्य झाले आहेत. बुधवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला, चंद्रपूर आणि वर्धा येथे ४४.८ अंश सेल्सिअस इतकी झाली. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे विदर्भ होरपळले आहे.

जळगाव, मालेगाव परभणी, अमरावती, गोंदिया, नागपूर, वाशीम येथे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ४३ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका वाढला असतानाच राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सध्या दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर रायलसीमापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात गुरुवारपासून (ता. २१) वादळी वारे, मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

पुण्यात हलक्या सरींची शक्यता

शहर आणि परिसरात बुधवारी अंशतः ढगाळ वातावरणाचे सावट पाहायला मिळाले. ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस अशीच कायम राहणार असल्याची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी हवामान पोषक होत असून पुण्यावर ही याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. पुणे व परिसरात येत्या शनिवारपर्यंत (ता. २३) अंशतः ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

येथे पावसाचा इशारा

गुरुवार (ता. २१) - नगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती.

शुक्रवार (ता. २२) - नगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, गडचिरोली.

शनिवार (ता. २३) - पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, गडचिरोली.

रविवार (ता. २४) - कोल्हापूर, सिंधूदुर्ग, सांगली, उस्मानाबाद.

या ठिकाणी पारा अधिक

अकोला - ४४.८

चंद्रपूर - ४४.८

वर्धा - ४४.८

नागपूर - ४३.६

ब्रह्मपुरी - ४४.७

जळगाव - ४३.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT