Heat Stroke Farmer death Sakal
महाराष्ट्र बातम्या

Heat Stroke : उष्माघाताचा पहिला बळी; शेतात काम करताना मजुराचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Heat Stroke : सध्या राज्यभरात तापमान वाढत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एकीकडे तापमान वाढत आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. वाढत्या तापमानाचा राज्यातील पहिला बळी गेला असून शेतात काम करताना शेतमजूराचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

अधिक माहितीनुसार, जळगाव येथील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सोमवारी सकाळी शेती कामासाठी गेला असता दुपारी शेतात काम करताना चक्कर आली आणि शुद्ध हरपली.

तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवण्याचा प्रयत्न त्याच्या सोबत असलेल्या मजुराने केला. पण प्रेमसिंग याने कसलीच हालचाल केली नाही. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

सध्या दिवसेंदिवस तापमान वाढत असून बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर; पुणे घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट, कोयना धरणात आवक वाढली

Cristiano Ronaldo Cry: रोनाल्डो ढसाढसा रडला... २१ नंबरची जर्सी अन् कंठ दाटून आला, पोर्तुगालच्या विजयानंतर नेमकं काय घडलं?

'माध्यमिक'च्या १४,५०० शिक्षकांचा पगार थांबला! वेतन अधीक्षक लाचेत सापडले, प्रभारी पदभार घ्यायला दुसऱ्या अधिकाऱ्याचा नकार, आता तिसऱ्याकडे पदभार, पण...

Farali Chilla: संकष्टी चतुर्थी स्पेशल! 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत फराळी चिला; खिचडी आणि वडा खाण्याचा कंटाळा येईल

जुलैचा पाऊस सोलापूरसाठी बेभरोशाचा! १६ जुलै १९०७ रोजी २४ तासांत १६०.३ मिलिमीटर, तर १९८९ सालातील जुलैत पडला होता ३६९.६ मिमी पाऊस, त्यानंतर निराशाच, वाचा...

SCROLL FOR NEXT