उष्णतेची लाट esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. येत्या १६ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. (Heat wave in Mumbai and adjoining districts warning by IMD)

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १६ मार्चपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना करुन काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

उत्तर-पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यानं समुद्रावरुन वाहणारे वारे वाहण्यास उशीर होत आहे. त्याचबरोबर सध्या आकाश निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील किनारी जिल्ह्यांना जसे रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला तीन दिवसांसाठी १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हात जाणं टाळावं, सैल आणि सुती कपडे वापरावेत आणि भरपूर पाणी प्यावं असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानात 2 दिवसांपूर्वी पेट्रोल स्वस्त, आज मोठी दरवाढ! भारतातही पेट्रोल-डिझेल महागणार?

Police Suspension News: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

AC चे तापमान २४ अंशांवर का ठेवावे?  'ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी'ने सांगितला महत्वाचा नियम!

Latest Marathi Update : - नाशिकमध्ये पुराच्या धोक्याचा अलर्ट

Brain Health: फक्त व्यायाम नाही! मेंदू निरोगी आणि तल्लख ठेवण्यासाठी 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा गोल्डन मंत्र

SCROLL FOR NEXT