weather update maharashtra  google
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पाऊस बरसणार? पुणे वेधशाळेचा अंदाज काय?

आगामी तीन ते चार दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. दडी मारलेल्या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस न पडल्यामुळे मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान राज्यात पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवातीला पावसाची शक्यता आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार आहे. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातून बहुतांश जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. दरम्यान, राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढत असल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मुंबईत मागच्या दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांची उष्णतेपासून सुटका झाली आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे मंगळवारी संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कमी प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT