Monsoon Update Maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update Maharashtra : मुसळधार पावसाचा मध्य महाराष्ट्राला इशारा

कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत मंगळवारी (ता. ११) ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागांत मंगळवारी (ता. ११) ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली आहे.

अर्धा महाराष्ट्र मॉन्सूनने व्यापला आहे. मात्र, उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरींची दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत मंगळवारी (ता. ११) जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्‍चिम जोड क्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना आणि विदर्भ, बुलडाणा जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा ‘येलो अलर्ट’ कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पेरण्यांना सुरुवात

राज्यात अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. राज्यातील शेतकऱ्याचे पावसाकडे डोळे लागले होते. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या. पाठोपाठ दुष्काळाची दाहकता वाढत गेली. मात्र, यंदा सुरुवातीच्या पावसामुळेच शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT