Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: आज पुणे-मुंबईसह 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

राज्यातील अनेक भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भांगामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता पुढील आणखी ४ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागामध्ये मोठ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी राज्यात पावसाचा जोर आणखी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे

तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर सुरू असल्याने पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT