Maharashtra Weather Updates  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, तर काही जिल्ह्यात पावसानं मारली दडी

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचा चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या शेतीकामे खोळंबली आहेत. राज्यातील कोकणासह मुंबई उपनगर ठाणे या परिसरात चांगला पाऊस पडत आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.(Latest Marathi News)

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आण विदर्भातह यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातही यलो अलर्ट दिला आहे.(Latest Marathi News)

राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. तर येत्या 4,5 दिवसात कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पुण्यातही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.(Latest Marathi News)

मुंबईत मात्र पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT