Maharashtra Rain Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : राज्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस;कोकणात जोरदार, विदर्भात पूरस्थिती,मराठवाड्यात पुनरागमन

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील १२४ मंडळांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून २७ मार्ग बंद आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील १२४ मंडळांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून २७ मार्ग बंद आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून गोंदिया जिल्ह्यात कान्होलीचा झरी तलाव फुटल्याने ८० एकरातील धान पीक पाण्याखाली गेले. आज सकाळी हा तलाव फुटला. अकोल्यात जोरदार पाऊस पडू लागला असून वाशीममध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांतील धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत काही मंडळांत २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे या भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. तर अनेक ओढे, नाल्यातील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात रिपरिप सुरू आहे. नाशिक, पुणे, सोलापूर भागांतही सरी कोसळत आहे.

सांगलीतील शिराळा तालुक्यात जोर कायम आहे. खानदेशातही धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत काही भागात हलक्या सरी पडल्या. कोल्हापूर, सांगलीत रविवारच्या तुलनेत सोमवारी (ता. २२) जोर काहीसा मंदावला आहे. मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. या भागातील जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहे. सध्या ढगाळ वातावरण असले तरी अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. सध्या तुरळक सरीमुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

कोकणात मुसळधार

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाऊस ओसरला असला तरी रविवारी खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. तेरेखोल, सुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. काही मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, जिल्ह्याच्या सर्व भागांत सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली होती. रत्नागिरीत भातशेती पाण्याखाली गेली आहे. धरणांची पातळी ८० टक्क्यांवर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT