Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी, मुंबई-पुण्यातही संततधार सुरू

मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

तर पुणे शहर परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळी कामासाठी बाहेर पडलेल्या नागरीकांना पावसामुळे काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागला. दरम्यान महिन्याभर दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मुंबईतही कालपासून पावसाने हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागांमध्ये पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे.राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यात अनेक भागांमध्ये सकाळपासूनत पावसाने जोरदार हजेरीही लावली आहे. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT