Nitesh Rane High court Hearing Sakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंना अटकेपासून दिलासा कायम, सोमवारी निकाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांच्यावर संतोष राणे हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सिंधुदुर्ग पोलिस त्यांना अटक करणार होते. मात्र, त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात (High Court Hearing on Nitesh Rane Case) धाव घेतली आहे. आज न्यायालयाने राणेंना अटकेपासून दिलेला कायम ठेवला असून याप्रकरणी सोमवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करता येणार नाही.

कणकवली येथील शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंना अटक करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी लावून धरली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी फिल्डींग लावली होती. पण, त्यापूर्वीच नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. पण, न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयानं त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक करता येणार नाही, असं राज्य सरकारला सांगितलं होतं. राज्य सरकारने देखील तशी हमी दिली होती.

आज नितेश राणेंच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. तसेच निर्णय राखून ठेवला असून सोमवारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. सध्या तरी त्यांची अटक पुढील सुनावणीपर्यंत टळली आहे. दरम्यान, या प्रकरणात सहआरोपी मनिष दळवी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तीवाद झाला. मनीष दळवी हे जिल्हा बँकेवर निवडून आलेले अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT