sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडेंना अटक करण्यापूर्वी द्यावी लागणार नोटीस, न्यायालयाचा दिलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिसांकडून (mumbai police) त्यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. मुंबई पोलिस त्यांना अटक करतील अशी भीती त्यांना आहे. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (high court) धाव घेतली आहे. न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे.

"माझ्यावरील आरोपांविषयी एनसीबीच्या तपास पथकाकडून आधीच चौकशी सुरू झाली आहे. मग मुंबई पोलिसांच्या स्वतंत्र विशेष तपास पथकाची आवश्यकता काय? मुंबई पोलिस मला लक्ष्य करेल. त्यामुळे सीबीआय किंवा एनआयएकडे तपास द्यावा", अशी विनंती समीर वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे. त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना ''समीर वानखडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवस आधी नोटीस देऊ'' असे सांगितले. हे सरकारी वकिलाने सांगितल्याने न्यायालयाने याचिका निकालात काढली. तूर्तास राज्य सरकारने कुठलीही कठोर कारवाई करू नये आणि अटक करायची असेल तर तीन दिवसांपूर्वी कळवावे, असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांना राज्य सरकारच्या कारवाई तूर्तास का होईना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांची काही कागदपत्रं देखील मलिक यांनी समोर आणली होती. त्यानंतर वानखेडेंच्या विरोधात मुंबई पोलिसांत ४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी एक समिती तयार केली होती. मात्र, एनसीबीकडून चौकशी सुरू असताना आता मुंबई पोलिसांकडून चौकशी का? असा प्रश्न उपस्थित करत वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT