eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde News : CM शिंदेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा! सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली

रोहित कणसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा मुंबईतील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेण्यात आला होता. यासंदर्भात करण्यात आलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. बीकेसीत झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील खर्चाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

बीकेसीत घेतलेल्या दसरा मेळाव्याविरोधातील ही याचिका कोर्टाने फेटाळली असून सुनावणीकरता याचिकाकर्ते आणि वकील गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाली.

नेमकं प्रकरण काय आहे?

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांनी मुंबईतील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेतला होता. यामेळाव्याला राज्यभरातून शिंदे समर्थक सहभागी झाले होते. समर्थकांच्या प्रवासासाठी सुमारे १७०० बसेस वापरण्यात आल्या. यासाठी शिंदे गटाकडून दहा कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा, आरोप याचिकेत करण्यात आला आहे. जोगेश्वरीतील रहिवासी दीपक जगदेव यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती..

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या खर्च कोणी केला होता, याची सीबीआय किंवा अन्य यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. एसटीच्या गाड्या वापरल्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली, असा दावाही करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT