Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

"...म्हणून ती मुलगी एकटी होती"; मुंबईतल्या महिला वसतीगृहातील 'त्या' घटनेवर चंद्रकांत पाटलांचं सभागृहात उत्तर

Mumbai Hostel Rape Case: मुंबईच्या शासकीय वसतीगृहात एका मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

Chandrakant Patil on Mumbai Rape case:काही दिवसांआधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर महिल्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन हल्ला बोल केला होता. मुंबई येथे शासकीय वसतीगृहात विद्यार्थीनीवर झालेल्या बलात्कार करण्यात आला होता, या प्रकराणात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं. त्यांनी या घटनेचा निषेध केला आणि ही घटना निंदनीय असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी वसतीगृहात सीसीटीव्ही कमी असल्याची गोष्टही मान्य केली.

यावर स्पष्टीकरण देताना ते चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मरीनड्राइव्ह येथील महिला शासकिय वसतीगृहात घडलेली घटना निंदनीय आहे."

जेव्हा ही घटना घडली तेव्हा, पूर्ण वसतीगृहात ती मुलगी एकटी होती. यावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, "ही इमारत डागडूजी करणे गरजचे असल्याने ८ कोटी मंजूर केले होते. कालांतराने संपूर्ण इमारतच पाडून नवी बांधावी लागणार त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पालकांनी परीक्षेपर्यंत वेळ मागितला."

यापुढे ते म्हणाले की , " पीडीत मुलगी एकटी त्या मजल्यावर राहत नव्हती. आजूबाजूला मुली होत्या, पण ज्यांच्या परीक्षा झाल्या त्या गेल्या, ही एकटीच होती. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे कृत्य सीसीटीव्हीत आले. सीसीटीव्ही नाहीत असं नाही, कमी होते."(Latest Marathi News)

तसेचं ज्या वसतीगृहामध्ये ही बलात्काराची घटना घडली, त्या वसतीगृहातील सर्व मुलींची वांद्रे येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचरबरोबर वसतीगृहाच्या अधिक्षिकांना निलंबित करण्यात आलंय. मुलीच्या भावाला अमरावतीमध्ये कंत्राटी नोकरी देण्यात आली असून पालकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

या घटनेनंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असून यात आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचाही समावेश आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT