महाराष्ट्र बातम्या

Hijab : राष्ट्रवादीच्या महापौर घराला देणार 'मुस्कान'चं नाव

हिजाब प्ररणाचे पडसाद सध्या देशभरात उमटताना दिसत आहेत.

सुधीर काकडे

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Row) प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात पाहायाला मिळत आहेत, आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात(Malegaon) जमियत उलेमा ए हिंदतर्फे येथील अजिज कल्लु स्टेडिअमच्या आवारात हिजाबचे समर्थन करण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक घ़डामोडी घडल्या,मात्र चर्चा सुरु आहे ती मालेगाव पालिकेच्या महापौर ताहेरा शेख यांच्या घोषणेची. मालेगावमध्ये असणाऱ्या उर्दु घराला आता हिजाब समर्थक मुस्कानचं नाव देणार असल्याची घोषणा ताहेरा शेख यांनी केली आहे.

कर्नाटकातील मंड्या येथील महाविद्यालयातील याच प्रकरणातील एक व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला आहे. हिजाब घालून महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या विद्यार्थीनीचा काही कट्टरतावादी विद्यार्थ्यांनी घोषणा देत विरोध केला. मात्र या विद्यार्थीनीनेही न घाबरता त्यांना उत्तर दिलं आणि ती महाविद्यालयात गेली. हा व्हिडिओ सध्या देशभरात व्हायरल होत असून, अनेकांनी या मुलीचं कौतुक केलं आहे. मुस्कान खान असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. त्यानंतर आता महापौर ताहेरा शेख यांनी मालेगावमधील उर्दू घरला 'मुस्कान'चं नाव देण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lungi Ngidi Updates: डोक्याला मार लागल्याने अँब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेलेल्या एनगिडीची कशी आहे प्रकृती? दिल्लीने दिले अपडेट्स

New Marathi Books : नव्या मराठी पुस्तकांची समृद्ध मेजवानी

Satara Protest: बुलडाणा आमदार संजय गायकवाड वादात; ‘शिवाजी कोण होता’ वाचनावरून साताऱ्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara Accident: दुर्दैवी घटना! रहिमतपूर येथे शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू; गाळ काढताना घडला अपघात..

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

SCROLL FOR NEXT