School subject sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या ‘इतक्या’ शाळांमध्ये पूर्वीपासूनच हिंदी भाषा; ‘SCERT’च्या नव्या परिपत्रकामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये यंदा दोनच भाषा

सोलापूर जिल्ह्यात सीबीएसई बोर्ड, आयसीएसई व स्टेट बोर्डाच्या (इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळा) सुमारे ३०० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी अनेक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकत आहेत. त्यातील एकाही पालकाने त्यासंदर्भात तक्रार केली नसल्याची बाब देखील पुढे आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळांमध्ये पहिलीपासूनच तीन भाषा शिकवण्यात येत आहेत. पाहिलीपासून तीन भाषांचा लळा लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजाराहून अधिक असल्याची माहिती 'सकाळ'च्या पहाणीतून पुढे आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सीबीएसई बोर्ड, आयसीएसई व स्टेट बोर्डाच्या (इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहाय्यिता शाळा) सुमारे ३०० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी अनेक वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकत आहेत. त्यातील एकाही पालकाने त्यासंदर्भात तक्रार केली नसल्याची बाब देखील पुढे आली आहे. दरम्यान, उर्वरित शाळांमध्ये मात्र पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा दोनच भाषा शिकवल्या जाणार हे स्पष्ट झाले आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय झाला होता. पण, हिंदी भाषेच्या कथित सक्तीवरून राजकीय गदारोळ झाला आणि शासनाने शिक्षण खात्याचे निर्णयच रद्द केले. आता समिती नेमून त्यावर अभ्यास होईल, पण समिती अजून नेमलेली नाही. समितीचा अहवाल यायला किमान तीन महिने लागणार असल्याने ‘एससीईआरटी’ने पूर्वीचे परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक काढले आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात सर्वसामान्यांची मुले शिकतात त्या शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी केवळ दोन भाषाच शिकविल्या जातील.

मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाचे त्रिभाषा सूत्रांबद्दलचे शासन निर्णय तूर्तास रद्द केले. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) तिसरी भाषा वगळून अध्यापनाच्या तासिकांचे सुधारित वेळापत्रक शाळांना दिले आहे. दुसरीकडे ‘बालभारती’नेही तिसऱ्या भाषेच्या पुस्तकांची छपाई थांबविली आहे.

शाळाना नवे वेळापत्रक, मराठीच्या तासिकांमध्ये वाढ

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना यंदा तिसरी भाषा नसेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुधारित वेळापत्रक दिले आहे. त्यात मराठी विषयांच्या तासिका वाढविल्या आहेत. ते वेळापत्रक सर्व शाळांना पोच झाले आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

पहिल्या परिपत्रकानुसार...

एससीईआरटीने १८ जून रोजी परिपत्रक काढले. पहिलीचा अभ्यासक्रम बदलला असून १७ जूनच्या शासन शुद्धिपत्रकानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा शिकविली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकानुसार शाळांमध्ये मराठी, इंग्रजी व हिंदी किंवा इतर भारतीय भाषा आणि गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षण असे विषय शिकविले जातील, असे नमूद होते.

----------------------------------------------------------------

सुधारित परिपत्रकानुसार...

‘एससीईआरटी’च्या ३ जुलैच्या सुधारित परिपत्रकानुसार आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी या दोन भाषाच शिकविल्या जातील, असे नमूद आहे. याशिवाय गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण अशा विषयांचेही तास होणार आहेत. या सुधारित परिपत्रकात सुधारित वेळापत्रकातून तिसरी भाषा काढून टाकल्याचे स्पष्टपणे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT