Hindu Jan Aakrosh Morcha  esakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदू जनआक्रोश मोर्चात सदावर्ते दाऊदवर संतापले: म्हणाले, त्याचे...

सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा

रुपेश नामदास

Hindu Jan Aakrosh Morcha: लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे आमदार, पदाधिकारी, नेते उपस्थित आहेत.

यामध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले आहेत.

मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागील काही दिवसांपासून सतत वादात असलेले गुणरत्न सदावर्ते या मोर्चात सहभागी झाले असून यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तान आणि दाऊदवर हल्लाबोल केला आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "पाकिस्तानच्या निच विचारामधून जे लव जिहाद चालू झालं. त्या लव जिहादला दफण करण्यासाठी मुंबईमधला हिंदू एकवटला आहे.

आम्ही सरकारला साकडं घालत आहोत. लव जिहाद विरोधात कायदा आणा दाऊदचा विचार दफण करा, बाबारचा विचार दफण करा.

हे लोक संत म्हणून आले आणि धर्म प्रसार करू लागले. या सर्व बाबी लक्षात घेता आज हिंदू एकवटला आहे." अशी प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईतील आघाडीचे नेते या मोर्चाला आवर्जुन उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT