Hindu Jan Aakrosh Morcha esakal
महाराष्ट्र बातम्या

Hindu Jan Aakrosh Morcha: मुंबईच्या शिवाजी पार्कात ‘जन आक्रोश’; भाजप नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

हिंदू जन आक्रोश मोर्चात मुंबईचे आघाडीचे नेते सहभागी

सकाळ डिजिटल टीम

लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. (Hindu Jan Aakrosh Morcha organized at dadar Shivaji Park mumbai )

हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले आहेत. आगामी काळात होवू घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुका पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्वा प्राप्त झालं आहे. मुंबईतील आघाडीचे नेते या मोर्चाला आवर्जुन उपस्थित आहेत.

देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया तसेच मशिदीवरील भोंग्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे.

मोर्चा कामगार मैदान मार्गे प्रभादेवी येथे पोहचणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गैर प्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथक देखील तैनात ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Pune Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको’; अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला अन्...

New Rule: 1 सप्टेंबरपासून खिशावर मोठा परिणाम! LPG, दूध, ITRसह 5 नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Aditi Tatkare: मंत्री आदिती तटकरेंच्या PROचा मृत्यू, शतपावलीला गेले अन् अचानक कोसळले

मराठमोळ्या अभिनेत्रीची हिंदी मालिकेत दमदार एंट्री; 'झी मराठी'च्या या सिरीयलचा आहे हिंदी रिमेक; फोटो पाहून ओळखू शकाल?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदींचा फोटो काढल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे - नवनाथ बन

SCROLL FOR NEXT