शेतकरी sakal
महाराष्ट्र बातम्या

Hingoli : हिंगाेलीत हळद लागवड सुरू

गत २४ तासांत ५.४० मिलिमीटर पावसाची नोंद

राजेश नागरे

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या दोन ते तीन दिवसांपासून कुठे दमदार तर कुठे रिमझिम पाऊस झाला. बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी जमिनीत झालेल्या ओलाव्यामूळे हळद लागवडीच्या कामाला सुरवात केली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत ५.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात तालुका निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे ः हिंगोली ३.९० मिमी, कळमनुरी ६.७० मिमी, वसमत ३ ५० मिलीमीटर, औंढा ५.२० मिमी, सेनगाव ८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात रविवार, सोमवार सलग दोन दिवस कुठे दमदार तर कुठे रिमझिम पाऊस झाला. मंगळवारी देखील रिमझिम पाऊस झाला.

बुधवारी दुपारपर्यंत सुर्यदर्शन झाले नाही. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली होती. यामुळे जिल्ह्यात कुठे हळद, कापूस लागवड तर काही ठिकाणी सोयाबीन , मुग, उडीद, तूर पेरणीला सुरवात झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने पेरणी सुरूच केली नाही. मोठा पाऊस पडल्यावरच पेरण्या सुरू करणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. दोन-तीन दिवस झालेल्या रिमझिम पावसाने तीन ते चार इंच जमीन ओली झाली आहे. यामुळे सोयाबीन, तुर पेरणी केली नाही. मात्र, जमिनीत ओलावा झाल्याने बेड पद्धतीने हळद लागवड सुरू केली आहे.

- एकनाथ नागरे , शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT