solapur rural police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

गृह विभागाचा आदेश! पंढरपुरात आता स्वतंत्र अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची पुनर्रचना; सोलापूरमध्ये आता 2 ॲडिशनल ‘एसपी’, वाचा...

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २४ जुलै रोजी शासन निर्णय काढून सोलापूर जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम व्हावे यासाठी अपर पोलिस अधीक्षक सोलापूर आणि नवनिर्मित अपर पोलिस अधीक्षक कार्यालय पंढरपूर, अशी दोन स्वतंत्र विभागांची पुनर्रचना केली आहे. पदभरतीनंतर लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २४ जुलै रोजी शासन निर्णय काढून सोलापूर जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम व्हावे यासाठी अपर पोलिस अधीक्षक सोलापूर आणि नवनिर्मित अपर पोलिस अधीक्षक कार्यालय पंढरपूर, अशी दोन स्वतंत्र विभागांची पुनर्रचना केली आहे. पदभरतीनंतर लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

गृह विभागाच्या नव्या निर्णयानुसार जिल्ह्याची विभागणी दोन मुख्य अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली आहे. पंढरपूर हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असल्याने आणि वाढती लोकसंख्या पाहता या निर्णयामुळे दक्षिण व पश्चिम सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, या नव्या अपर अधीक्षक कार्यालयातील पदनिर्मिती व अन्य खर्चासाठी ४० लाखांहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडील मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या आस्थापनेवरील मनुष्यबळाची पुनर्रचना होणार आहे. गृह विभागाच्या आदेशामुळे पंढरपूरला आता नवे अपर पोलिस अधीक्षक मिळणार आहेत. यापूर्वी पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.

‘गृह’च्या आदेशानुसार नवी पुनर्रचना अशी...

१) सोलापूर अपर पोलिस अधीक्षक कार्यालय

सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (सोलापूर तालुका, मोहोळ, कामती, मंद्रुप व सायबर पोलिस ठाणे), अक्कलकोट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (वळसंग, अक्कलोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण), बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, पांगरी, माढा पोलिस ठाणे), करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (कुर्डुवाडी, टेंभुर्णी व करमाळा पोलिस ठाणे), अशी चार उपअधीक्षक कार्यालयाकडील १६ पोलिस ठाणी सोलापूर अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संलग्न असणार आहेत.

-----------------------------------------------------------------

२) पंढरपूर अपर पोलिस अधीक्षक कार्यालय

पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर, पंढरपूर ग्रामीण, पंढरपूर मंदिर सुरक्षा, करकंब पोलिस ठाणे), मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (सांगोला, मंगळवेढा पोलिस ठाणे) आणि अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय (अकलूज, माळशिरस, नातेपुते व वेळापूर) अशी तीन पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडील ११ पोलिस ठाणी नव्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संलग्न असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT