Amit Shah Pune Visit Sakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah Pune Visit: अमित शहांच्या दौऱ्यात ऐनवेळी मोठा बदल! कार्यक्रमानंतर सर्व बैठका रद्द; तातडीने गाठणार दिल्ली

केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत, त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवारी) संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले. त्यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा आहे. शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल संध्याकाळी पुण्यात दाखल झालेत. अमित शहा यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी राखीव वेळ ठेवला होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यात बदल झाला आहे. कार्यक्रम संपवून शाह डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. तिथे बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह तातडीने दिल्लीला जाणार आहेत. यामुळे या बैठका सकाळी ११ वाजताच सुरु झाल्या आहेत.

अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT