Home Minister Dilip Walse Patil appeal to political leaders on the backdrop of festivals  sakal
महाराष्ट्र बातम्या

परिस्थिती बिघडेल असे वक्तव्य करु नका; गृहमंत्र्यांचे नेत्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक सण लागोपाठ साजरे केले जाणार आहेत यादरम्यान कायद्याचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आज या सणांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

येत्या काही दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती , गुड फ्रायडे आणि रमजान हे सगळे सण हे एकत्रीत आले आहेत. हे सर्व सर्व नागरिक आतिशय उत्साहाणे साजरा करत असतात, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आबाधित राहावी, तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठीच्या तयारीसाठी आज बैठक झाली. या बैठकीत सर्व वरिष्ठ आधिकराी उपस्थित होते. पूर्ण तयारीत राहावं अशा सूचना त्यांना दिल्या आहेत, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितलं.

सगळे सण शांततेत पार पडतील यासाठी पोलिसांची पूर्ण तयारी आहे, कोणी काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर पोलिस जबाबदारीनं हाताळतील, कोणालाही सूट दिली जाणार नाही, असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी दिला.

राज्यातील परिस्थिती बिघडेल असे वक्तव्य करु नका असे सांगताना त्यांनी राजकीय नेत्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य करु नयेत त्यासोबतच नागरिकांनी अशा वक्तव्यांना बळी पडू नये असे आवाहन देखील केले. ते म्हणाले की, माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करावे, शांततेत सगळे सण साजरे करावेत. तर राज ठाकरे यांच्या ठाणे येथील सभेविषयी विचारले असाता, ते म्हणाले की सभा होईल ते काय बोलतील त्यावर नंतर बोलणं योग्य राहील.

तसेच त्यांनी सोशल मिडीयावर येणाऱ्या पोस्टवरही पोलिस लक्ष ठेऊन आहेत, काही आक्षेपार्ह आढळलं तर कारवाई करण्यात येईल. पोलिस सक्षम आहेत कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय. यादरम्यान सोमय्या यांचा अटरपूर्व जामीन फेटाळला त्यावर आणि कुचिक प्रकरणावर मात्र गृहमंत्र्यांनी बोलण टाळलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT