nawab malik-aryan khan esakal
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खान आणि नवाब मलिक दोन वेगळे विषय - गृहमंत्री

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर (Aryan Khan case) एनसीबीने कारवाई केल्यानंतर मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळतात. त्यांच्या जावयावर देखील एनसीबीने आरोप केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक वारंवार एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळे आरोप करताना दिसतात. त्याबाबतच गृहमंत्री दिलीप वळसे (home minister dilip walse patil ) पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून 'आर्यन खान आणि नवाब मलिक हे दोन वेगळे विषय' असे ते म्हणाले. गृहमंत्री सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय. यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे एनसीबी आणि त्याच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत. त्यामुळे ते वारंवार बोलत असतात, असेही गृहमंत्री म्हणाले.

दीक्षाभूमीला भेट देण्याची इच्छा पूर्ण -

नागपूरला ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे. गृहमंत्री झाल्यानंतर मी नागपूरला आलो आहे. यावेळी दीक्षाभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण झाली, असेही गृहमंत्री म्हणाले.

परमबीरसिंह यांनी अँटेलिया प्रकरणातील माहिती लपविली होती?

परमबीरसिंह यांनी अँटेलिया स्फोटके प्रकरणातील माहिती लपविली होती का? असा प्रश्न विचारला असता गृहमंत्री म्हणाले, ''आयोगाच्या समोर काय माहिती आली आणि कोणी माहिती लपविली? हा चौकशीचा भाग आहे. आयोगाचा अहवाल आल्याशिवाय त्याबाबत काय कारवाई करायची? हे कसं ठरवणार.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT