Dilip Walse Patil Dilip Walse Patil
महाराष्ट्र बातम्या

‘पोलिसांच्या कारवाईला नव्हे तर एनसीबीच्या कारवाईला प्रसिद्धी मिळते’

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील जनतेला सुरक्षित वाटते का हे महत्त्वाचे (Does the public feel safe?) आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, असे म्हटले जाते. मात्र, ऑक्टोबर २०२० शी तुलना केली तर गुन्ह्यात घट झाल्याचे पाहायला मिळते. कोरोनाच्या काळात पोलिस बंदोबस्तात (Police settlement) होते. त्यांच्यावर ताण आला होता. मात्र, आता खून आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याच्या तपासात वाढ झाली, असे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. आधी ३० सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी काही सदस्यांनी सूचना केल्या, तर काहींनी प्रश्न मांडले. भाषण सुरू करण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांचे अभिनंदन करतो, असे गृहमंत्री म्हणाले. अमली पदार्थांच्या तस्करीची मोठी कारवाई झाली. परंतु, राज्याच्या पोलिसांच्या कारवाईला जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी तेवढी मिळत नाही. एनसीबीच्या कारवाईला प्रसिद्धी मिळते, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

राज्यात दारूबंदीबाबत गुन्ह्यांच्या कारवाईत वाढ झालेली आहे. कौटुंबिक हिंसाचाऱ्याच्या गुन्ह्यात देखील वाढ झालेली आहे. राज्यात बलात्काराच्या ज्या घटना घडल्या त्यातील ८० टक्के घटना या पूर्व परिचित व्यक्तींकडून घडलेल्या असल्याचे पाहायला मिळते. महिला आणि मुलींना दुसऱ्या व्यक्तींकडून नव्हे तर परिचित व्यक्तींकडूनच अधिक धोका असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

आता ‘शक्ती विधेयक’ आणले

महिलांवरील अत्याचार कमी व्हावा तसेच त्याला आढा बसावा यासाठी आता ‘शक्ती विधेयक’ आणले आहे. महिलांवरील अत्याचार व बलात्काराच्या घटना घडू नये म्हणून हा कायदा आणला आहे. महिलांवर अत्याचार करण्याची कुणाची यापुढे हिंमत होऊ नये म्हणून हा कायदा आणला आहे. संघटित गुन्हेगारी मोडून काढायची असेल तर आपल्याला कारवाई करावी लागेल. या कारवाईच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT