Maharashtra Police Bharti 2022 News esakal
महाराष्ट्र बातम्या

7,200 कर्मचाऱ्यांची पोलीस भरती गृहखातं स्वत:च करणार, घोटाळे टाळण्यासाठी निर्णय

सकाळ डिजिटल टीम

पोलीस दलात जाणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोरोना काळात पोलीस दलातील घटलेली कर्मचारी संख्या, निवृत्त अधिकारी आणि मागील दोन वर्षात फूलटाईम भरती न झाल्याने पोलिसांवरील वाढलेला दबाव पाहता गृहखात्याने पोलीस भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीईटी, लष्कर आणि आरोग्य परीक्षांमध्ये समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे गृह खातं स्वतच ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे. (Home Minister Dilip Walse)

यासाठी कोणत्याही एजन्सीला कंत्राट देणार नसल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता गृहखात्याचा हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर झाला आहे. भरती प्रक्रियेचे अधिकार प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. (Maharashtra Police Bharti 2022 News)

मागील पाच वर्षांपासून गृह खात्यात कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मंत्रीमंडळात प्रस्ताव मांडला होता. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राज्यातील पोलीस दलात 7 हजार 200 नव्याने कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची अंतिम यादी पुढील महिन्यात जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. तर, भरतीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले. (Maharashtra Police Recruitment)

7,200 कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया अंति टप्प्यात

राज्यात सध्या 7 हजार 200 पोलिसांशी भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी झाली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात सात हजार 200 पोलिसांच्या भरती संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरती प्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.

गृहमंत्री वळसे -पाटील यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात ई-टपाल प्रणालीचे उद्‌घाटन व वृक्षारोपन करण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलिसांची आढावा बैठक घेतली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.

मंत्री वळसे-पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन काम करावे. माहिती-तंत्रज्ञानाचा वापर केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत ओह. या गुन्ह्यांकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हा पोलिसांना दिल्या. जिल्हा पोलिसांनी सुरू केलेली ई-टपाल प्रमाणीचे काम चांगले असून भविष्यात राज्यातही हा प्रयोग राबविण्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस ठाणे-वसाहतीला निधी

गेल्या अनेक दिवसांपासून नेवासे, राहुरी आणि पाथर्डी पोलीस ठाण्यासाठी इमारतीचा विषय प्रलंबित होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणे, चौकी व पोलिसांसाठी वसाहतीचे प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये लक्ष घालून निधी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT