22BMANILDESHMUKH.jpg 
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी ! गृहमंत्री म्हणाले... मानाच्या नऊ पालख्या हेलिकॉप्टरने येतील पंढरीत 

तात्या लांडगे

सोलापूर : पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडूरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा वारी रद्द केल्याने 30 जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने की हेलिकॉप्टरने पंढरपुरात आणायच्या या पर्यायांची चाचपणी सुरु आहे. त्याबाबत काही दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

दरवर्षी पंढरीच्या पांडूरंगाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, आता कोरोनाचे वैश्‍विक संकट राज्यावर आले असल्याने वारकऱ्यांनी घरी राहून पांडूरंगाची सेवा करावी. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित राहील. मानाच्या पालख्या हवाई मार्गाने की रस्त्यावरुन येतील, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते रद्द करावेत. कोणतेही पास वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात अव्वल असल्याने गृहमंत्री, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्ता भरणे आदींनी सोलापुरचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली. 


मृत पोलिसांचे कुटुंब शासकीय निवासातच राहील 
कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकार, पोलिस महासंचालक व अन्य पर्यायातून प्रत्येकी 65 लाखांची मदत केली जात आहे. दुसरीकडे संबंधित मृत पोलिस कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार होता, त्या दिवसापर्यंत त्यांचे कुटुंबिय शासकीय निवासातच राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मृत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य पदकेही दिली जातील, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. राज्य सरकार व शासकीय अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असून त्यांचे कार्य उत्तमप्रकारे सुरु असल्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. 


वारीबाबत गृहमंत्री म्हणाले... 

  • 30 जूनपर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरीत दाखल होतील 
  • 1 जुलै रोजी पालख्या पंढरीतील चंद्रभागा नदीत स्नान करतील 
  • प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील; पालख्यांसोबत एकूण 18-20 वारकरी असतील 
  • 2 जुलै रोजी मंदिरात पालख्यांची भेट होईल आणि तेथून सायंकाळी आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतील 
  • वारीसाठी ज्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

Bank Open or Closed Update: अनंत चतुर्थीला महाराष्ट्रात बँका सुरू की बंद? RBI कडून मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Nandigram By-Election Symbol Controversy : निवडणूक आयोगाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर; 183 चिन्हं असताना 'लिफाफा' वरच वाद का? हायकोर्टानं कोणाला सुनावलं?

SCROLL FOR NEXT