Honey Bee Attack Esakal
महाराष्ट्र बातम्या

Honey Bee Attack: अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर मधमाशांचा हल्ला, 200 जण जखमी

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

गड किल्ल्यांवर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर वारंवार मधमाशांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाम्हणी या गावातील स्मशानभूमीत घडली आहे.

अपघाती मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर आणि जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत 200 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना काल रविवारी (24 सप्टेंबर) रात्री समोर आली आहे.

शुभम भोयर या तरुणाचा अपघातात शनिवारी (23 सप्टेंबर) रात्री मृत्यू झाला. शुभम भोयर आणि त्याचा चुलत भाऊ मयूर भोयर दोघे दुचाकीवर जात असताना अपघात झाला. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. त्याच्यावर बाम्हणी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याच्या अंत्ययात्रेवेळी मधमाशांनी हल्ला केला.

या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाच दिसेल तिकडेपळत सुटले. प्रेत तिथेच सोडून लोक पळाले. काही नागरिक गावाच्या दिशेने पळाले, तर काही जण गाडीवर गेले. काहींनी नदी पात्रात उडी घेतली.

परंतु मधमाशांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान 200 नागरिक किरकोळ जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमी नागरिकांनी नदीच्या पैलतिरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर खासगी रुग्णालय गाठून तिथे उपचार घेतले आणि त्यानंतर घरी परतले. परंतु या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली.

हल्ल्यात 200 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमी नागरिकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर रुग्णालय उपचार घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT