zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; पटसंख्या कमी होऊन शाळा बंद पडू नये म्हणून सरपंचाचा पुढाकार

जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर जवळा (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीने एक स्तुत्य व अनुकरणीय पाऊल उचलले आहे. गावातील पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यास त्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगोला : जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही ग्रामीण शिक्षण क्षेत्रापुढील गंभीर समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर जवळा (ता. सांगोला) येथील ग्रामपंचायतीने एक स्तुत्य व अनुकरणीय पाऊल उचलले आहे. गावातील पालकांनी आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यास त्यांची ग्रामपंचायतीची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंख्या वाढविणे, तसेच ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाकडे नेणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. सद्य:स्थितीत अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा शाळा वाचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ग्रामपंचायतीचा हा निर्णय पालकांना प्रोत्साहन देणारा ठरेल आणि जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास वाढवण्यास मदत करेल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीने घरपट्टी माफ करण्याच्या निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरू होती. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळा असून त्याअंतर्गत गतवर्षी एक लाख ९० हजारांपर्यंत विद्यार्थी प्रवेशीत होते.

ही अनोखी चळवळ उभी राहिली पाहिजे

तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषद शाळांना बळ देणे गरजेचे आहे. आमच्या ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अनोखा व अभिमानास्पद आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत व त्यांना वैभव प्राप्त झाले पाहिजे. सध्या राज्यातील ग्रामविकास खातेही सक्षमपणे काम करीत आहे. ही अनोखी चळवळ उभी राहिली पाहिजे.

- दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार

आपली मुले गावातीलच जिल्हा परिषद शाळेत दाखल करावीत

पालकांनी आपला पाल्य जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे पत्र ग्रामपंचायतीस दिल्यास त्यांची घरपट्टी माफ करण्यात येईल. जास्तीत जास्त पालकांनी आपली मुले गावातीलच जिल्हा परिषद शाळेत दाखल करावीत, हाच यामागील मुख्य हेतू आहे.

- सज्जन मागाडे, सरपंच, ग्रामपंचायत, जवळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT