anil parab sakal media
महाराष्ट्र बातम्या

विधानपरिषदेच्या जागा कशा रिक्त राहू शकतात, अनिल परबांचा सवाल

विधानसभेचे सहा महिन्यांपेक्षा जागा रिक्त ठेऊ शकत नाही. मग विधानपरिषदेच्या जागा कशा रिक्त राहू शकतात - अनिल परबांचा न्यायालयाच्या निर्णयावर सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची कॉपी आमच्याकडे आली नाही. माहिती आहे 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. आम्ही ही विधी तज्ज्ञांशी चर्चा केली होती. विधिमंडळ कामकाजात न्यायालयाने हस्तक्षेप केला नव्हता. न्यायालयाने निकाल कसा दिला आम्ही सविस्तर अभ्यास करू, असे मत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अॅड अनिल परब (Anil Parab) यांनी व्यक्त केले आहे. आज शुक्रवारी (ता.२८) सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे १२ आमदारांचे निलंबन रद्द केले आहे. त्याबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परब म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयाने 12 आमदार नियुक्तीबाबत जागा रिक्त ठेवता येणार नाही, असा निकाल दिला होता. दोन वेगवेगळे निकाल कसे असू शकतात. न्यायालयाचा निकालाचा अभ्यास करून भूमिका घेणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी स्पष्ट केले.(How Can Legislative Council 12 MLC Seats Vacant , Said Anil Parab)

राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती केली जात नाही. विधानसभेचे सहा महिन्यांपेक्षा जागा रिक्त ठेऊ शकत नाही. मग विधानपरिषदेच्या जागा कशा रिक्त राहू शकतात. आम्ही केलेली कृती ही समर्थनीय होती. कोर्टाने जो निकाल दिला आहे. त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. कायदेशीर तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले. (12 BJP MLAs)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: लग्नासाठी सोनं घेणार? आधी ही बातमी वाचा! 20 हजारांनी महागलं सोनं; सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर? पाहा ताजा भाव

VIRAL VIDEO: इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाला नाइटक्लबबाहेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

रितेश देशमुखवर चक्क उधारी! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...'मला त्याची उधारी चुकवायची, प्लीज मदत करा'

Marathi News Live Updates : पंढरपूरमध्ये अचानक भाविकांची गर्दी वाढली

Akola Online Vehicle Fraud: वाहन विक्रीच्या आमिषाने ९.९० लाखांची फसवणूक: नागपुरातून आरोपी जेरबंद; फसवणुकीतील एक लाख गोठविले

SCROLL FOR NEXT