Amruta Fadnavis News 
महाराष्ट्र बातम्या

ट्रॅफिक जाममुळे घटस्फोट? वाचा अमृता फडणवीसांनी दिलेलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: ट्रॅफिक जाममुळं मुंबईत तीन टक्के घटस्फोट होतात, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं. हे विधान कशाच्या आधारे केलं याचं स्पष्टीकरण आता अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. वाहतूक कोंडींन होणाऱ्या घटस्फोटाच्या विधानावर अमृता फडणवीसांकडून सर्व्हेची माहिती जारी करण्यात आली आहे. 'सर्व्हे मंकी' वेबसाईटनं केलेल्या सर्व्हेचा अमृता फडणवीस यांनी दाखला दिला आहे. (Amruta Fadnavis News)

'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी कोणतंही विधान करते तेंव्हा ते रिपोर्ट्स पाहून करते. सर्व्हे मंकीने एक सर्व्हे केला होता आणि त्यातून त्यांना जे निष्कर्ष मिळाले त्यातून त्यांनी मांडलं होतं की, तीन टक्के घटस्फोट हे या प्रकारामुळे होतात. जसे की, फॅमिलीला वेळ नाही देऊ शकलो. वेळ द्यायची इच्छा होती मात्र, ट्रॅफिक जामसारख्या समस्येत अडकलो. त्यातून फॅमिली लाईफ अफेक्ट होते, त्यामुळे डिव्होर्स होतात, असं हा सर्व्हे सांगतो. त्याचा दाखला देऊन मी ते वक्तव्य केलं होतं. मुंबईसाठी करण्यात आलेला 'सर्व्हे मंकी'कडून हा दावा करण्यात आला आहे. (Amruta Fadnavis Statement on Divorce)

पुढे त्यांनी म्हटलंय की, नेदरलँड देशातल्या एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वांत खराब ट्रॅफिक हे मुंबईचं आहे. त्याच्यात 41 हजार कोटीपेक्षा अधिक आपण पैसा वाया घालवतो आहे. एवढा जास्त खर्च कुठेच जगात इतरत्र होत नाही. यावर सोल्यूशन आहे, मात्र ते आजवर अंमलात आलेलं नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT