solapur-hydrabad highway solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

महामार्गापासून किती अंतरावर असावे घर, हॉटेल, दुकाने? ‘त्या’ बल्कर चालक व एसटी चालकाच्या रक्ताचे नमुने पाठविले पुण्याच्या प्रयोगशाळेला; दारु पिऊन वाहन चालविल्याचा संशय

महामार्गालगत सर्व्हिस रोड असल्यास सर्व्हिस रोडपासून दोन ते चार मीटर आणि सर्व्हिस रोड नसलेल्या ठिकाणी महामार्गाच्या मध्यापासून ३० मीटर अंतरापर्यंत दुकान, घर असू नये, असा नियम आहे. असे असतानाही सध्या सोलापूर शहराजवळील महामार्गांलगतच चिकटून दुकाने थाटलेली दिसतात.

तात्या लांडगे

सोलापूर : महामार्गालगत सर्व्हिस रोड असल्यास सर्व्हिस रोडपासून दोन ते चार मीटर आणि सर्व्हिस रोड नसलेल्या ठिकाणी महामार्गाच्या मध्यापासून ३० मीटर अंतरापर्यंत दुकान, घर असू नये, असा नियम आहे. असे असतानाही सध्या सोलापूर शहराजवळील महामार्गांलगतच चिकटून दुकाने थाटलेली दिसतात. तरीदेखील, त्याकडे वाहतूक पोलिस किंवा महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष नाही.

महामार्गांवरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात झाल्यास त्यात निष्कारण कोणाचाही बळी जाणार नाही, याची दक्षता घेत ‘एनएचएआय’ने महामार्गांलगत किती अंतरापर्यंत घरे, दुकाने असू नयेत हे निश्चित केले आहे. मात्र, सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर अशा बहुतेक महामार्गांलगतची वस्तुस्थिती वेगळीच आहे. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडजवळील गटारीला चिकटूनच अनेकांनी दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे अनेकदा अपघातग्रस्त वाहने त्यात शिरुन अनेकांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे या दुकानांसमोरील दुभाजक देखील काढून टाकलेला दिसतो. भविष्यातील धोका ओळखून ‘एनएचएआय’ने त्यांच्याकडील महामार्गांचा सर्व्हे करून त्या अनधिकृत दुकानदारांना हटविले पाहिजे, जेणेकरून कोणालाही अपघातात निष्कारण जीव गमवावा लागणार नाही. जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समित्यांची बैठक वेळेत होऊन अशा बाबींवर ठोस कार्यवाही अपेक्षित आहे.

नोटीस बजावण्याच्या संबंधितांना सूचना

महामार्गांपासून किती अंतरात घरे, गॅरेज किंवा अन्य दुकाने नसावीत, यासंदर्भातील नियमावली आहे. महामार्गांवर वाहने थांबल्यास किंवा गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली वाहने महामार्गालगत त्या निश्चित अंतरात उभारली जात असल्यास त्या गॅरेज किंवा दुकान मालकाला नोटीस बजावून कारवाई केली जाते. त्याअनुषंगाने सध्या संबंधितांना निर्देश देऊन नोटिसा बजावण्यास सांगितले आहे.

- राकेश जवादे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग विकास प्राधिकरण, सोलापूर

महामार्ग विकास प्राधिकरणाकडून उपाययोजना नाहीत

शहरहद्दीतील महामार्गांवर विशेषत: ज्या ठिकाणी महामार्गावरील दुभाजक तोडलेले आहेत अशा ठिकाणी लोखंडी संरक्षक जाळी बसावावी, अपघातप्रवण ठिकाणी देखील त्याची गरज आहे. तसेच वर्दळीच्या ठिकाणी महामार्गावर लाईटची पुरेशी सोय करावी, रस्ता क्रॉसिंगच्या ठिकाणी सूचना फलक, रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे असावेत, असा अनेकदा महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला. पण, काहीही कार्यवाही झालेली नाही.

- सूरज मुलाणी, पोलिस निरीक्षक (वाहतूक), सोलापूर शहर

बल्कर चालक अन्‌ एसटी चालकाच्या रक्ताचे नमुने पाठविले पुण्याच्या लॅबला

हैदराबाद रोडवर तिघांचा बळी घेणाऱ्या बल्कर चालकावर जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मद्यपान करुन वाहन चालविले का, याची तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्याच्या तोंडाचा वास मद्यपान केल्यासारखा येत होता. दुसरीकडे कुंभारी टोल नाक्यावर थांबलेल्या कंटेनरला मागून धडक देणाऱ्या बसचालकाच्याही तोंडाचा दारू पिल्याचा वास येत होता म्हणून त्याच्याही रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेला पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात एसटी बसमधील ४० ते ४५ पैकी १६ प्रवासी जखमी झाल्याचेही वळसंग पोलिसांनी सांगितले.

सिमेंट बल्करला शहरात ‘नो एन्ट्री’; तरीपण शहरहद्दीत सर्वाधिक अपघात

सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना सोलापूर शहरातून प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सिमेंट घेऊन ये-जा करणारे बल्कर होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळून कुंभारीला येतात आणि तेथून हैदराबाद रोड, सोलापूर-पुणे महामार्ग असे जातात. विजयपूरकडे जाणारे बल्कर ‘बीएमआयटी’जवळील पुलावरून हत्तूर बायपासवरुन पुणे रोडला किंवा अन्य ठिकाणी जातात. तरीपण, शहर हद्दीत बल्कर अनेकांसाठी काळ ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT