महाराष्ट्र बातम्या

दहावीनंतरचे करिअर कसे घडवावे प्रश्न पडलाय? तर जॉईन करा 'दिशा'चे वेबिनार!

सकाळवृत्तसेवा

सध्या बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे करिअर कोणत्या क्षेत्रात करावं हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यासाठी दहावीचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. दहावी परीक्षेनंतर मिळालेल्या मार्कांवरून आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स शाखेची निवड करण्याकडे पालक व विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. करिअर घडविताना पाल्याचे अंगीभूत गुण व क्षमतांचा विचार करायला हवा, हा विचार गेल्या काही वर्षांत रुजू लागला आहे. सुजाण पालकत्वाची ही भूमिका अधिक समृद्ध करण्यासाठी वाईतील दिशा ऍकॅडमी सातत्याने प्रयत्न करते. 

कोरोनाच्या संकट काळात सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्ष, पालकांच्या मनातील शंका; मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्‍चर, डिफेन्स या क्षेत्रात करिअर, अशा अनेक पैलूवर प्रकाश टाकण्यासाठी सकाळ आणि दिशा ऍकॅडमी वाई यांच्या संयुक्त विद्यमाने "दहावीनंतर काय?' याविषयावर विनामूल्य वेबिनार रविवार दिनांक 21 जून रोजी, सकाळी 11 वाजता Zoom App वर (झूम ऍपवर) घेण्यात येणार आहे. यात वाईच्या दिशा ऍकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम सर मार्गदर्शन करतील. करिअर मार्गदर्शन वेबिनार तीन भागांत होणार असून, दुसऱ्या भागात इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी कोणत्या? कोविड- 19 मुळे असणाऱ्या टाळेबंदीचा या परीक्षांच्या तयारीवर काय परिणाम होऊ शकतो, या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. सदर मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी आवश्‍यक असून, इच्छुकांनी 7775925923 / 7775024445 या फोन नंबर संपर्क साधावा.

वाईतील दिशा ऍकॅडमी सायन्स शाखेतील विविध स्पर्धा परीक्षांची सर्व्वोत्तम तयारी करून घेते. सर्व अत्याधुनिक सोईसुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक, मेस, हॉस्टेल सुविधा, शहरातल्या गर्दीपासून दूर, अभ्यासावर लक्ष केंद्रात करता येईल, असे वातावरण आणि ऑनलाइन पद्धतीने शिकता येईल, असे काटेकोर नियोजन करून सोशल डिस्टन्सिंग, आरोग्य व सुरक्षेच्या सर्व मानदंडाचे पालन यावर दिशा ऍकॅडमीने भर दिलेला आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थिती विद्यार्थी मित्रांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. 

करिअरची निवड करताना Aptitude Test चे काय महत्त्व, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्‍चर, डिफेन्स कोर्सच्या परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, दहावीनंतर करिअरची निवड कशी करावी? कॉलेजेस व ब्रॅंचेस या विषयी सविस्तर माहिती देणारा वेबिनार समाजाच्या बदलत्या गरजा आणि करिअरच्या संधी सोपेपणाने समजावून सांगेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT