narayan rane ,uddhav thackeray
narayan rane ,uddhav thackeray sakal
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या मनातलं मी कसं ओळखणार - नारायण राणे

रश्मी पुराणिक

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्या विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान केलं, त्यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb danwe) मंचावर उपस्थित होते. शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) पुन्हा युती होणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विधानाबद्दल त्यांचे कट्टर विरोधक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी "उद्धव ठाकरेंच्या मनातलं मी कसं ओळखणार, मी काही ज्योतिषी नाही. ते आज काय बोलतील उद्या काय ते सांगू शकत नाही" असं उत्तर दिलं. "त्यांनी स्पष्टपणे सांगावं हे माझे उद्याचे सहकारी आहेत. आम्हाल फेवर असेल तर मी आता कशाला बोलू?" असे राणे म्हणाले.

चंद्रकात पाटील परिस्थिती बदलेल असे म्हणाले होते आणि आज मुख्यमंत्र्यांनी भावी सहकारी असं विधान केलं. त्यावर राणेंनी "चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. ते संकेत देऊ शकतात. वातावरण बदलत असेल, अंदाज आला असेल त्यावरुन संकेत दिले असतील" शिवसेना-भाजपा एकत्र आले, तर तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर "भाजपाच्या नेत्यांनी स्वीकरलं, तर माझ्या आवडी-निवडीचा काय संबंध?" असं उत्तर राणेंनी दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Nashik Lok Sabha Election : नाशिककरांनो, निर्भयपणे मतदान करा! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे सोशल मीडियावरून आवाहन

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केल्या सर्व मर्यादा पार, अश्लील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SRH vs PBKS Live Score : पंजाबची 150 धावांपर्यत मजल; प्रभसिमरनला बाद करत व्यशकांतने दिला धक्का

SCROLL FOR NEXT