महाराष्ट्र बातम्या

कसा करणार 'कोविड19' चा मुकाबला ? राज्यातील तब्बल 'एवढ्या' जिल्ह्यांमध्ये टेस्टींग लॅबच नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा धोका वाढत असताना अद्यापही राज्यातील तब्बल अकरा जिल्ह्यात स्वॅब टेस्ट लॅब नाही, अशी माहिती आज मुंबई उच्च न्यायालयात याचिकादारांने दिली. मात्र सरसकट लॅबची आवश्यकता नसून याबाबत अन्य पर्यायांचा विचार सरकार करीत आहे, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून निकाल राखून ठेवला आहे.

रत्नागिरीमधील मच्छीमार खलील वास्ता यांनी एड राकेश भाटकर यांच्या मारफत केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या ए ए सय्यद यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ काॅन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लॅब निर्माण केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात लॅब नाही तेथे पर्याय शोधण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. समितीचा अहवाल पुढील आठवड्यात येईल त्यानंतर आर्थिकदृष्ट्या पाहणी करून याचा विचार होईल, असे सरकार च्या वतीने खंडपीठापुढे सांगण्यात आले.

मात्र सध्या अकरा जिल्ह्यात लॅब नाही. त्यापैकी रत्नागिरीमध्ये एक कोटी सात लाख रुपयांची तरतूद लॅबसाठी केली आहे. मात्र अन्य अकरा जिल्ह्यात लॅब नाही. एकूण 78 लॅबपैकी  मुंबईत २२, पुणे १९, ठाणे ६, नागपूरमधील ६ लॅबचाही समावेश आहे. तसेच शंभर संशयित रुग्ण आढळल्यावरच लॅब उभारण्यात याव्यात या आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच त्यांची उभारणी करण्यात येते, असे  महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली. न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी पूर्ण केली असून निकाल राखून ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT