Praniti Shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसचा उमेदवार विजयी कसा होईल? मताधिक्यासाठी बालेकिल्ल्यात काँग्रेसला बांधावी लागणार मोट; ‘शहर मध्य’मधील मताधिक्य निर्णायक; ‘MIM’च्या भूमिकेकडे लक्ष

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरेल. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला पक्षातून सोडून गेलेल्यांसह नेत्यांची मजबूत मोट बांधावी लागणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला ३१ हजार मते अधिक होती.

तात्या लांडगे

सोलापूर : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसला पक्षातून सोडून गेलेल्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांची मजबूत मोट बांधावी लागणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला ३१ हजार मते अधिक होती. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवाराला या ठिकाणी घाम गाळावाच लागेल, हे निश्चित.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही वेळेस मोदी लाट होती हे निश्चित. पण, आता वातावरण थोडे बदलल्याची स्थिती असून याचा लाभ घेताना काँग्रेस उमेदवाराला बारकाईने नियोजन करावे लागणार आहे. सुरवातीला त्यांच्याच पक्षातील मतभेद व पक्ष सोडून गेलेल्यांची वज्रमूठ बांधावी लागेल.

गत निवडणुकीत भाजपसोबत काम केलेले अनेकजण आता महाविकास आघाडीसोबत असल्याचा प्लसपॉईंट काँग्रेसकडे आहे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला असून त्याकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला परवडणारे नाही, हे निश्चित. ‘आता नाहीतर पुन्हा कधीच नाही’ असे मानून काँग्रेसला काम करावे लागणार आहे.

आमच्या पक्षाची भूमिका अजून ठरलेली नाही

लोकसभा निवडणुकीत एमआयएमची भूमिका अजून ठरलेली नाही. पण, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर मध्य, दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे प्रत्येकी ४० हजारांहून अधिक मतदान आहे. अक्कलकोटमध्येही मतदान मोठे आहे. आता पक्षाच्या निर्णयानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करू.

- फारुक शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएम, सोलापूर

----------------------------------------------------------------------------------

भाजपचा पराभव हेच आमचे ध्येय

भाजप व नरेंद्र मोदी यांचा पराभव करणे हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून या शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला किमान एक लाखांवर मते मिळतील.

- नरसय्या आडम, माजी आमदार, माकप

‘शहर मध्य’मध्ये या नेत्यांची ताकद

माजी प्रकाश यलगुलवार, आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, तौफिक शेख, सुधीर खरटमल, चेतन नरोटे, पुरुषोत्तम बरडे, तौफिक हत्तुरे, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, जुबेर कुरेशी, बाबा करगुळे, गणेश डोंगरे यांची ताकद आहे. यांच्यासह इतर माजी नगरसेवकांची मोट काँग्रेसला बांधावी लागणार आहे. त्याशिवाय ‘शहर मध्य’मधून मताधिक्य शक्य नसल्याची वस्तुस्थिती आहे.

२०१९च्या लोकसभेतील पक्षनिहाय मते

  • भाजप

  • ८०,८२३ (विजयी)

  • काँग्रेस

  • ४९,९४१

  • वंचित बहुजन आघाडी

  • २७,४६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: रुग्णवाहिका होती, पण चालक जेवायला गेला; वाशी स्थानकात तरुणाचा दुर्दैवी अंत, काय घडलं?

Pimpalgaon Jalal Toll Plaza : वाहनधारकांना मोठा दिलासा; १८ वर्षांनंतर मालेगाव-मनमाड-कोपरगाव हायवे टोलमुक्त

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

Sangli Farmer : एक रुपयाची योजना बंद होताच रब्बी पीक विम्याला सांगलीत फटका; केवळ २५ टक्के शेतकरी सहभागी

Richest Temples India: भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान...कोणाकडे किती संपत्ती? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT