Prithviraj Chavan Sangram Thopte esakal
महाराष्ट्र बातम्या

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

सकाळ डिजिटल टीम

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत निर्णय होणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker) अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा पुढे आल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुन्हा चर्चेत आलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांचंही त्यावर एकमत होण्याची शक्यता वाढलीय, त्यामुळं विधानसभा अध्‍यक्षपदी आमदार चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही आवाजी मतदान पद्धतीनं घेण्याबाबत निर्णय होणार असल्याचं कळतंय. त्यानंतरच अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीनं घेण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला होता, त्यामुळं आज आवाजी पद्धतीनं अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात आज नियम समिती या प्रस्तावाचं अवलोकन करून आवाजी मतदानानं अध्यक्षपद निवड करण्याबाबत निर्णय घेऊ शकते. याकरता सूचना व हरकतींचा विचार करुन दुपारपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीबाबतचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. हाच नियम महाराष्ट्रात बदलण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसकडून येत्या सोमवारी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला जाईल, असंही सांगण्यात येतंय.

अध्यक्षपदासाठी कोणती नावे चर्चेत

विधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडं राहणार आहे, त्यामुळं काॅंग्रेसमधून अध्यक्ष पदासाठी संग्राम थोपटे (Sangram Thopte), तर शिवसेनेकडून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचं समजतंय.

संग्राम थोपटे : सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवलीय. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे. गेल्या दोन वेळा संग्राम थोपटेंची अध्यक्षपदाची संधी हुकली होती. त्यामुळं अध्यक्षपदाची माळ थोपटेंच्या गळ्यात पडण्याकरता पहिल्या क्रमांकानं थोपटेंचं नाव चर्चेत आहे.

पृथ्वीराज चव्हाण : हे भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. 10 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. 2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण ह्यांनी मुख्यमंत्रिरीपदाचा राजीनामा दिला. ह्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. पृथ्वीराज चव्हाण काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय, सभागृहाच्या कामाकाजावर पृथ्वीराज चव्हाणांची चांगली पकड राहिलीय, त्यामुळं अध्यक्षपदासाठी ते प्रमुख दावेदार असल्याचं मानलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

IND vs PAK : B@#@# मुझे आंख दिखाती है! पाकिस्तानच्या फिरकीपटूने 'डोळे वटारले', हरमनप्रीत कौरने बघा काय केले? Video Viral

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

SCROLL FOR NEXT