HSC Result  sakal media
महाराष्ट्र बातम्या

HSC RESULT : राज्यभरातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी प्रथम श्रेणीत!

संजीव भागवत

मुंबई : बारावीच्या परीक्षेत (hsc exam) कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या अंतर्गत मूल्यमापनातून राज्यभरातील (maharashtra) तब्बल अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना 75 टक्के अधिक गुण मिळाले (students high marks) आहेत. त्यामुळे यंदाच्या निकालात 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची (distinction marks students) संख्याही मोठ्य प्रमाणावर वाढली आहे. (hsc exam-maharashtra-students high marks-distinction marks students-hscresult-nss91)

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 13 लाख 19 हजार 754 विद्याध्यापिकी तब्बल 6 लाख 88 हजार 730 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले सर्वाधिक लाख 34 हजार 675 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. त्याखालोखाल 1 लाख 14 हजार 66 विद्यार्थी (पुणे), 1 लाख 11 हजार 225 (औरंगाबाद), 83 हजार 394 (अमरावती), 67 हजार 525 (नाशिक), 65 हजार 765 (नागपूर), 56 हजार 212 (लातूर), 47 हजार 153 (कोल्हापूर), 8715 (कोकण) एवढे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यातील केवळ 2 हजार 638 विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे. तर दुसरीकडे या परीक्षेत 4 हजार 789 विद्यार्थी परीक्षेत अयशस्वी | ठरले आहेत. त्यांना कारोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मंडळाकडून परीक्षेची संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्याच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिका-यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यावर दहा दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT