Buldhana Paper Leak Sakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर ११९ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधीच मिळाला होता

गुन्हे शाखेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बारावीचा गणिताचा पेपर ११९ विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तासभर आधीच मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेच्या तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे.

अहमदनगरमधल्या एका महाविद्यालयातल्या ३३७ मुलांपैकी ११९ मुलांना हा गणिताचा पेपर फोडण्यात आला. त्यांचेच महाविद्यालय त्यांना परीक्षा केंद्र म्हणून मिळाल्याने हा पेपर फोडल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातल्या शिक्षकांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.

गुन्हे शाखेच्या तपासातून या गोष्टी समोर आल्या आहेत. दहा हजार रुपयांना पेपर फुटल्याचं या आधी तपासात समोर आलं होतं. महाविद्यालयाच्या मालकासंदर्भातही काही पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस महाविद्यालयाच्या मालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT