Maharashtra 12th Result Updates  Sakal
महाराष्ट्र बातम्या

HSC Result 2022: बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी; निकाल जाहीर

राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. (Maharashtra 12th Result Updates)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी - मार्च २०२०च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.(Maharashtra HSC Board Result News)

विभागवार निकाल खालीलप्रमाणे -

कोकण विभाग: ९७.२१ टक्के

पुणे: ९३.६१

नागपूर: ९६.५२

औरंगाबाद: ९४.९७

मुंबई: ९०.९१

कोल्हापूर: ९५.०७

अमरावती: ९६.३४

नाशिक: ९५.०३

लातूर: ९५.२५

राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. त्यापैकी मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे. ४ मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

बारावीचा निकाल कोठे पाहायचा?
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- https://hsc.mahresults.org.in

९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेले विद्यार्थी -

पुणे: १७२१

नागपूर: १०४६

मुंबई: २७६६

कोल्हापूर: ५९३

अमरावती: १७८३

नाशिक: ६१२

लातूर: ५६३

कोकण: १३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT