महाराष्ट्र

हुरडा पार्ट्या झाल्या दुर्मिळ

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब - शेतात डोलणाऱ्या हिरव्यागार ज्वारीच्या पिकाशेजारी आगटी पेटवून बोचऱ्या थंडित घेतलेला गरमागरम हुरड्याचा आस्वाद काही औरच! एके काळी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हमखास दिसणारे हे दृश्य काळाच्या ओघात दुर्मिळ झाले असले तरी अजूनही काही ठिकाणी मित्र व आप्तस्वकियाना बोलाऊन जिव्हाळ्याच्या हुरडा पार्टया होताना दिसत आहेत.

ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा नवीन वर्षात सिद्धेश्वराच्या गड्डा यात्रेबरोबरच हुरडा पार्टिसाठी खवय्याना खुणावत असतो. मात्र अलीकडच्या काळात सतत उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितिमुळे आणि ऊस, द्राक्षे, डाळीम्ब, केळी यासारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल यामुळे दिवसेंदिवस ज्वारीचे उत्पादन घटत चालले आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात जिरायती ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण यावर्षी जिल्ह्याच्या अनेक भागात पेरणी योग्य पाऊसच झाला नाही. त्यामुळेही ज्वारीच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. काही प्रमाणात घेतलेले बागायती ज्वारीचे पीक मात्र सध्या हूर्ड्यात आलेले आहे. अशा ठिकाणी हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आगटीमध्ये भाजलेला गरमागरम हुरडा आणि सोबतिला गुळ व लसणाची चटनी यामुळे खवय्ये तृप्त होताना दिसत आहेत.

अलीकडच्या काळात हुरडा पार्टया तर दुर्मिळ झाल्या आहेतच, पण संक्रातिच्या वाणासाठी लागणारी ज्वारीची कणसे पण वेळ प्रसंगी भेटत नाहीत. हुरडा पार्टीच्या निमित्ताने एकत्र जमुन गरमागरम हूर्ड्याचा आस्वाद घेत गप्पानच्या छान मैफिली पूर्वी रंगायच्या. अलीकडे असे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत. आपली ग्रामीण संस्कृती जोपासन्याच्या दृष्टीने हुरडा पार्टयांसाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत. - नवनाथ शिंदे (प्राथमिक शिक्षक,अरण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT