Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'त्यांचा मला फोन नाही...', जयंत पाटील अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा

राष्ट्रवादी पक्षात फूट

धनश्री ओतारी

IF & LS कंपनी घोटाळा प्रकरणी ईडीकडून काल जयंत पाटील यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यांच्या चौकशीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन त्यांना आला नाही. त्यामुळे जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. (I didn't get Ajit Pawar's call Jayant Patil said after ED Enquiry maharashtra politics )

ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. दरम्यान, त्यांनी भेटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईडीच्या चौकशीनंतर कुणाकुणाचा फोन आला, अजितदादांचा आला होता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तेव्हा जयंत पाटील यांनी सर्वांचे फोन आल्याचे सांगितलं. मात्र, अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारल्यावर नाही मला त्यांचा फोन आला नव्हता असं स्पष्ट सांगितलं.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीची चर्चेने उत आला आहे.

ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील काय म्हणाले?

IF & LS कंपनीबाबत मला माहिती नाही. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले असेल. मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनीदेखील चांगली वागणूक दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच तक्रार करणार नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटलांची चौकशी झाली ते प्रकरण काय?

IL&FS कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट उपकंत्राटदार देण्यात आलं. उपकंत्राटदारानं कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी संबधित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. जयंत पाटील त्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री होते.

IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले. कंपनीचे एकूण 250पेक्षा अधिक सब्सिडरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत.

जमिनीच्या वादात जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळं प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचं ईडीने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT